Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू

जळगाव- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू आहे. अशातच आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसात वाऱ्याच्या तडाख्यात

तिरुका येथील संपादित जमिनीवर महामार्गाचे काम सुरू
अनेर धरणा मधून, अनेर नदीत पाणी सोडण्यात यावे यासाठी बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे वरती रास्ता रोको आंदोलन
भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

जळगाव- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू आहे. अशातच आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसात वाऱ्याच्या तडाख्यात उभा कंटेनर उलटल्याने आडोशाला उभे असलेल्या दोन जणांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावाजवळ आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी व्यक्तीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भोला श्रीकुसूम पटेल, चंद्रकांत वाभळे असे मयत झालेल्या कामगारांचे नावे आहेत. जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बिहार राज्यातील काही मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. यावेळी वादळी वारा आणि पावसापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतु वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड उडाले. त्यामुळे शेडमधील मजूर हे पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला जाऊन उभे राहिले. मात्र वारा एवढा सुसाट होता की उभा कंटेनर उलटला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल, चंद्रकांत वाभळे हे दोघे दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली.

COMMENTS