नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजप नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ला केंद्र सरकारचे अपयश असल्याचे विधान करून भाजपच
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजप नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ला केंद्र सरकारचे अपयश असल्याचे विधान करून भाजपची मोठी कोंडी केली होती. त्यानंतर गुरूवारी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मलिक यांची भेट घेतली.
या दोघांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मलिक यांनी विरोधकांना ‘वन इज टू वन’ हा फॉर्म्युला दिला होता. तसेच या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेरणे शक्य असल्याचे म्हटले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआला जवळपास 45 टक्के मते मिळाली होती. तर उर्वरित 55 टक्के मते काँग्रेससह इतर पक्षांना मिळाली. 2024 मध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी या 55 टक्के मतांना एकत्रित करण्याची गरज आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ’एक इज टू’ फॉर्म्युला दिला आहे. त्यानुसार जेव्हा इतर सर्व विरोधी पक्षांनी मिळून मजबूत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध एकच उमेदवार उभा केला, तेव्हा त्याला ’वन इज टू वन’ असे म्हणतात. सत्यपाल मलिक म्हणाले होते की, 2019 चा पुलवामा हल्ला गृहमंत्रालयाचा निष्काळजीपणा होता. सीआरपीएफला हेलिकॉप्टर दिले नाही. रस्ता मार्गावर सुरक्षेची व्यवस्था नव्हती. मलिक यांचा आरोप आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले होते. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मलिक यांचे वक्तव्य खरे असेल तर ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना ते गप्प का बसले? त्यांच्या वक्तव्याच्या विश्वासर्हतेची तपासणी व्हावी. लपवण्यासारखे भाजपने काहीच केले नाही.
COMMENTS