Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ससेवाडी येथील शेतकर्यांचे मुलं झाले पोलीस

अजय काळकुटे यांची पुणे शहर तर पूजा सावंत यांची पुणे ग्रामीण मध्य निवड

मांजरसुंबा प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागील फेब्रुवारी महिन्यात पोलीस भरती घेण्यात आली होती या पोलीस भरतीमध्ये बीड तालुक्यातील ससेवा

एसटी संपाचा तिढा सुटता सुटेना
महिलांनी शारीरिक समतोल जोपासणे गरजेचे : डॉ. अनिता बांगर
संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून

मांजरसुंबा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागील फेब्रुवारी महिन्यात पोलीस भरती घेण्यात आली होती या पोलीस भरतीमध्ये बीड तालुक्यातील ससेवाडी गावातील शेतकर्याच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वतः मेहनत घेत यश संपादित  केले.
या परीक्षेत अजय अनुरथ काळकुटे याची पुणे शहर पोलिसात तर पूजा जालिंदर सावंत हिची पुणे ग्रामीण पोलिसात निवड झाली आहे.  फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या फिजिकल व परीक्षेत अजय अनुरथ  काळकुटे या विद्यार्थ्याने 150 गुणांपैकी 130 गुण येऊन ओपन कॅटेगरी मधून  परीक्षेत पास झाला तर पूजा जालिंदर सावंत या विद्यार्थिनीने 150 गुणापैकी 128 गुण घेऊन महिला ईडब्लूएस या कॅटेगिरीतून परीक्षेत घवघवीत यश मिळवलं या दोघांचेही आई-वडील शेतकरी आहेत दोघांच्याही घरची परिस्थिती हालाखीची होती परंतु त्या परिस्थितीवर मात करून दोघांनीही खूप मेहनत घेतली आणि अभ्यास केला आणि परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले यांच्या झालेल्या निवडीमुळे त्यांच्या आई-वडिलांसह ससेवाडी व परिसरातील लोकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले व आनंदोत्सव साजरा केला.

COMMENTS