Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छोटीवाडीचा जयभिम महोत्सव जिल्ह्यात ठरला आदर्श

सामाजिक एकोप्यातून विविध उपक्रम पडले पार

बीड प्रतिनिधी - माजलगाव तालुक्यातील छोटीवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त तीन दिवस जयभिम महोत्सव आयोजित करण्यात आला

अदानी ग्रुपला मोठा फटका
जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार : डॉ.प्रदीप व्यास
परकीय आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज रहावे ः गोविंद जाटदेवळेकर

बीड प्रतिनिधी – माजलगाव तालुक्यातील छोटीवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त तीन दिवस जयभिम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या तीन दिवसांच्या जयभिम  महोत्सवात विविध कार्यक्रम पार पडले.सामाजिक एकोप्यातून अवघे गाव या जयभिम महोत्सवात सहभागी झाले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक आदर्श जयभिम महोत्सव म्हणून छोटीवाडीच्या जयभिम महोत्सवाने शिक्का मोर्तब केला आहे. प्रत्येक कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने झाली.त्यामुळे असा जयभिम महोत्सव प्रत्येक गावागावात साजरा होणं अपेक्षित आहे. एवढा आदर्श छोटीवाडी येथील जयभिम महोत्सवाने घालून दिला आहे.
 छोटीवाडीची लोकसंख्या जेमतेम त्यातही आंबेडकरी समूहाची घरे बोटावर मोजण्या ऐवढीच आहेत. असे असताना एक आदर्श जयंती म्हणून छोटीवाडी  जयभिम महोत्सवाने आपली एक वेगळी छाप पाडली आहे. या जयभिम महोत्सवाने योग्य नियोजन आणि शिस्त जिल्ह्याला दाखवून दिली आहे. या जयभिम महोत्सवाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धेने करण्यात आली. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.  गावात स्वछता मोहीम, तसेच आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार कार्ड मोहीम राबविण्यात आली. समाज जागृत होण्यासाठी अभिवादन सभा पार पडली. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबीर घेण्यात आले. वामनदादा कर्डक कला अकादमी बीड यांचा क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम पार पडला. जयभिम महोत्सवात भोजनदान कार्यक्रम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य आणि शिस्तीने मिरवणूक काढण्यात आली. एकंदरीत हा जयभिम महोत्सव साजरा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि महापुरुष युवामंच, गावातील सर्व समाजाच्या नागरिकाने मोलाचे परिश्रम घेतले. दरम्यान या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ तर अध्यक्ष म्हणून छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहन जगताप, प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती विद्या मंदिरचे सचिव उत्तम पवार, प्रमुख वक्ते म्हणून अनिल डोंगरे होते. यावेळी देवदूत प्रतिष्टान अध्यक्ष बंडू खांडेकर, विजय साळवे, राजेश घोडे, राजेश साळवे, शेख बाबा, अमरसिंह ढाका, प्रशांत वासनिक. अड. राजेश शिंदे, अड. नारायण गोले, जगण खेत्री, राजेभाऊ पास्टे, संगमेश्वर आंधळकर, इंजि.लहू मस्के, डॉ. नांदकुमार उघडे, सरपंच अंगद दळवी, प्रल्हाद दळवी, चेअरमन रंजित जाधव, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन पत्रकार सुनिल  डोंगरे यांनी केले.  
चांगल्या कामासाठी पुढाकार महत्वाचा
कोणतेही काम अथवा उत्सव साजरा करण्यासाठी नियोजन आणि पुढाकार महत्वाचा असतो. पत्रकार सुनिल डोंगरे यांनी हा जयभिम महोत्सव पार पाडण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि नियोजन यातून छोटीवाडीची भिम जयंती एक आदर्श जयंती ठरली आहे. त्यामुळे असे तरुण पुढे येणं  गरजेचं आहे. अशा भावना छोटीवाडीचे सरपंच अंगद कटके यांनी व्यक्त केल्या.
लोक एकत्रित येत गेले
समाजामध्ये पत्रकारांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण लोक त्याच्याकडे न्यायिक म्हणून पाहतात. म्हणूनच पत्रकार सुनिल डोंगरे यांनी जयभीम महोत्सव साजरा करण्यासाठी लोकांना आवाज दिला आणि लोक एकत्रित येत गेले आणि हा जयभिम महोत्सव साजरा झाला. एवढेच नव्हे तर एक आदर्श महोत्सव म्हणून अधोरेखित झाला. हा जयभिम महोत्सव पार पाडण्यासाठी सर्वांनी पत्रकार सुनिल डोंगरे यांना दिलेली साथ कौतुकास्पद आहे. असे मत जिजाऊ अर्बनचे चेअरमन रंजित जाधव यांनी व्यक्त केले.  

COMMENTS