रेमडेसिवीर नंतर आता फॅबिफ्लू चा तुटवडा  ; संगमनेरातील एकही औषधालयात फॅबिफ्लू उपलब्ध नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडेसिवीर नंतर आता फॅबिफ्लू चा तुटवडा ; संगमनेरातील एकही औषधालयात फॅबिफ्लू उपलब्ध नाही

कोरोना रुग्णांसाठी जीवदान ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कमी झाल्यानंतर उसळलेला काळाबाजार आणि नफेखोरी सामान्य नागरीक अनुभवत असताना आता रेमडेसिवीरसाठी पर्यायी ठरलेल्या फॅबिफ्लू गोळ्यांचा तुटवडा संगमनेर शहरात निर्माण झालेला आहे.

गांजा व अमली पदार्थाची वाहतुक व विक्री करणारी टोळी जेरबंद
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
राज्यात गुटखाबंदीसाठी विशेष पथकाची निर्मिती करा

संगमनेर/प्रतिनिधी : कोरोना रुग्णांसाठी जीवदान ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कमी झाल्यानंतर उसळलेला काळाबाजार आणि नफेखोरी सामान्य नागरीक अनुभवत असताना आता रेमडेसिवीरसाठी पर्यायी ठरलेल्या फॅबिफ्लू गोळ्यांचा तुटवडा संगमनेर शहरात निर्माण झालेला आहे. संगमनेर तालुक्यात दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण कोरोना बाधित आढळत आहेत. 

 कोरोना बाधित रुग्णांना नियमित फॅबिफ्लू द्यावी लागते. अशातच या गोळ्या शहरातील औषधालयांवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची एकच पळापळ बघायला मिळत आहे. आधीच तालुक्यातील सर्व कोविड सेंटरवर ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन, व्हेंटिलेटर यासुविधांची वानवा असताना आता नव्या समस्येला सामान्य जनतेला तोंड द्यावे लागत आहे. संगमनेर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे हे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीचे व गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

 “संगमनेर शहरातील औषधालयात फॅबिफ्लू उपलब्ध नाहीत याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. जर औषध उपलब्ध नसतील तर अन्न व औषध प्रशासनसोबत चर्चा करून उपाययोजना करण्यात येतील.”-अमोल निकम, तहसीलदार संगमनेर.  

COMMENTS