Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत  वितरणचा लहरी कारभार दीडशे गावे अंधारात

किनवट प्रतिनिधी - विद्युत महावितरणच्या मनमानी कारभाराला ग्रामीण भागातील जनता वैतागली असून 33 के. व्ही. किनवट वरून येणार्‍या मुख्य वाहिनी बंद झाल

नांदेडमधील अपघातात 5 जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात 47 मिमी पावसाची नोंद; ओढे, नाल्यांना पूर
लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार

किनवट प्रतिनिधी – विद्युत महावितरणच्या मनमानी कारभाराला ग्रामीण भागातील जनता वैतागली असून 33 के. व्ही. किनवट वरून येणार्‍या मुख्य वाहिनी बंद झाल्याने काही तास सहा  उपकेंद्रातील दीडशे गावे अंधारात बुडाली होती.
विद्युत पोल तुटून वीज पुरवठा खंडित होणे, निकृष्ट पोल आणि खड्डा खोलवर नसल्याने वारे वादळातून पोल तुटून पाळीव जनावरा सह मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होतानाच्या घटना,वीजपुरवठा बंद ठेवण्याचा घटना हल्ली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. किनवट 132  के. व्ही वरून 33 के.  व्ही मांडवी फिडरवर  मांडवी, डोंगरगाव कणकी, उमरी बाजार, सारखणी, माळ बोरगाव गावं, वानोळा या सहा  33 के व्ही उपकेंद्रांना एकाच 33 के व्ही फिडर वरून वीजपुरवठा होतो. ही वाहिनी तब्बल 100 किलोमीटर जंगलातून टाकलेली असल्याने हवा पावसात वीज वाहिनीला अडथळे निर्माण सिमेंटची निकृष्ट असलेले पोल तुटण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने विद्युत सेवा वारंवार खंडित होऊन याचा शेतकरी कामगार ,छोटे व्यावसायिक यांच्या जीवनमानावर मोठा परिणाम होताना दिसून येत असे असताना जिल्हास्तरापासून तालुकास्तरापर्यंतचे विद्युत अभियंते हे ठेकेदारांना पाठीशी घालण्याच्या नेहमी प्रयत्नात ठेकेदारा मार्फत चांगल्या दर्जाची कामे होताना दिसून येत नाही. विद्युत समस्या दूर करण्याचा महावितरण कंपनी कधीच प्रयत्न करीत नाही. त्यामुळे हवा येताच वीजपुरवठा खंडित होतो. आणि संपूर्ण वातावरण शांत होईपर्यंत वीज पुरवठा सुरू केल्या जात नाही. एन केन प्रकारे 33 के व्ही वीजपुरवठा सुरू झालाच तर अनेक उपकेंद्रातील  बहुतांश 11 के व्ही फिडर ब्रेक डाऊन राहतात. त्यामुळे शेकडो गावे गेल्या तीन दिवसापासून रात्रीला अंधारात राहत आहे. रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्याने ग्रामीण भागात चौथ्या दिवशी परिसराचा वीजपुरवठा खंडित होता. ब्रेक डाऊन वीज वाहिनीची कोणतीही दुरुस्ती न करता सकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला. इन्सुलेटर किंवा डिक्सचा चोर पंचर बिघाड असल्याने पाऊस पडताच वीजपुरवठा खंडित होतो. आणि काही तासानंतर आपोआप वीज बोर्ड पुन्हा सुरू होतो. या प्रकाराची तपासणी संबंधित लाईनमन करत असल्याने परिसर नेहमी अंधारात बुडत आहे . महावितरणचा ढेपाळलेला कारभार सुधारण्यासाठी मुख्य अभियंता नांदेड, कार्यकारी अभियंता भोकर, यांनी विद्युत लाईनच्या कामाची जाय मोक्यावर जाऊन चौकशी करून संबंधित ठेकेदारांना दर्जेदार कामे करण्याच्या सूचना देऊन संबंधित देयके प्रदान करण्याची आवश्यकता आहे. मागील कार्यकाळातील री ओढण्याचा प्रयत्न झाल्यास जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल. अशा तिखट प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.

COMMENTS