Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिरुका येथील संपादित जमिनीवर महामार्गाचे काम सुरू

जळकोट प्रतिनिधी - जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 चे काम गत अनेक महिण्यापासू बंद आहे. पाच ते सहा महिन्यापूर्वी जळक

चिपळूण येथील सुभेदार अजय ढगळे शहीद
अकोल्यात झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू
सायकल रॅलीतून सोलापूर रेल्वे विभागाने दिला पर्यावरण पूरक संदेश

जळकोट प्रतिनिधी – जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 चे काम गत अनेक महिण्यापासू बंद आहे. पाच ते सहा महिन्यापूर्वी जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी तिरुका येथील शेतक-यांंची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड येथील अधिका-याकडे दिला होता. या ठिकाणी स्वत: उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी भेट दिली व तात्काळ संपादित जमिनीच्या जागेवर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करावे अशा सूचना नांदेड येथील महामार्ग विभागाच्या अधिका-यांना दिल्याने संपादित केलेल्या जमिनीवर महामार्ग विभागाकडून काम सुरू करण्यात आले आहे.
हा ताबा देऊन अनेक महिन्याचा कालावधी झाला तरी या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड कडून काम सुरु करण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ मोठी नदी आहे. या नदीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड च्या वतीने मोठा पूल उभारण्यात आला आहे परंतु या पुलाच्या पुढील तसेच मागील काम गत अनेक महिन्यापासून बंदच आहे . सद्यस्थितीत असलेल्या पुलापेक्षा 50 ते 60 फूट उंच आता नवीन पूल झालेला आहे. हा पूल उंच झाल्यामुळे तिरूका गावाजवळील जे बसस्थानक होते त्या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात आला आहे. आता आहे त्या पुलापासून पश्चिमेकडे नवीन पूल उभारण्यात आला आहे. नवीन पूल बांधकाम पूर्ण झाले आहे .यामुळे आता पूर्वीच्या रस्त्याच्या पश्चिमेकडूनच रस्ता प्रशासनाने तयार करण्यासाठी शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत परंतु काही शेतक-यांनी हा रस्ता अडविल्यामुळे, पुलाच्या दोन्ही बाजूकडील काम थांबलेले होते. गत चार महिन्यापूर्वी तहसीलदार जळकोट यांच्या उपस्थितीमध्ये शेतक-यांबरोबर चर्चा होऊन यामध्ये तोडगा करण्यात आला व या रखडलेले रस्त्याचे काम पुन्हा सुरू होईल असे सांगण्यात आले , परंतु या रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते यामुळे वाहनधारकांना जुन्याच पुलावरून प्रवास करावा लागत होता. या जुन्या पुलावर मोेठे खड्डे पडले आहेत, या पुलाच्या दोन्ही बाजूंचे कडे तुटले आहेत. त्यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच तिरुका गावाजवळ मोठा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे व यापुढे उंच असं नवीन पूल तयार करण्यात आला आहे मात्र सध्या जी वाहनांची वाहतूक आहे ती जुन्याच पुलावरून सुरू आहे.. उडान पुलावरचा रस्ता अतिशय अरुंद असून मोठा चढ असल्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तिरुका गावा जवळील काही शेतक-यांच्या तक्रारनंतर हा रस्ता बंद करण्यात आला होता पुन्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा काढण्यात आला होता परंतु पुन्हा या रस्त्याचे काम रखडले होते. रस्ता संपादित झाला होता तसे शेतक-यांंनीही रस्ता करण्यास परवानगी दिली होती असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडने हे काम सुरू केले नव्हते. त्यामुळे स्वत: उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी लक्ष घालून तात्काळ काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या, राष्ट्रीय महामार्ग विभागाने 20 एप्रिल पासून काम सुरू केले आहे.

COMMENTS