Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मोदी सरकारच्या काळात भारताचे उत्त्पन्न दुप्पट

नंदुरबार प्रतिनिधी - देशातील मोदी सरकारच्या काळात भारतातीयाचे दरडोई उत्पन्न दुप्पट झाले असून देश आर्थिक प्रगतीकडे झेपावत असल्याचे मत केंद्रीय

बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न
सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार :पालकमंत्री गुलाबराव पाटील 
तलाठ्याच्या चुकीमुळे वृध्द निराधार महिलेचे झाले पैसे बंद

नंदुरबार प्रतिनिधी – देशातील मोदी सरकारच्या काळात भारतातीयाचे दरडोई उत्पन्न दुप्पट झाले असून देश आर्थिक प्रगतीकडे झेपावत असल्याचे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांनी व्यक्त केले. नंदुरबारमध्ये वंजारी समाजाच्या मेळाव्याला आलेल्या भागवत कराडांनी भारताची आर्थिक भरारी ही इंग्लडपेक्षाही वेगाने असल्याचे सांगत आपण भारताचे नागरिक भाग्यवान असल्याचे म्हटले आहे. २०१४ साली मोदी सत्तेत आले तेव्हा भारतातील प्रत्येक नागरिकाचे दरडोई उत्पन्न एक लाख रुपये होते. तेच आता 1 लाख 90 हजारांवर गेल्याचे यावेळी मंत्री कराडांनी सांगितले. १६ लाख कोटीचा अर्थसंकल्प आज ४५ लाख कोटींवर गेला असून आर्थिक प्रगतीमध्ये भारत हा जगात ११ क्रमांकाहून पाचव्या क्रमांकावर पोहचल्याचे यावेळी मंत्री भागवत कराड म्हणाले

COMMENTS