भारतात येत्या 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार आहे. त्याच दिवशी रशियातून 'स्पुटनिक-व्ही'लसीची पहिली खेप भारतात पोहचणार आहे.
नवी दिल्ली : भारतात येत्या 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार आहे. त्याच दिवशी रशियातून ‘स्पुटनिक-व्ही’लसीची पहिली खेप भारतात पोहचणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) प्रमुख किरील दिमित्रीव यांनी ही माहिती दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना दिमित्रीव म्हणाले, की ‘स्पुटनिक-व्ही’लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात दाखल होईल. रशियाकडून मिळणाऱ्या या लसीमुळे भारताला कोरोनाविरोधातील लढ्यात मदत मिळेल. आरडीआयएफने 5 मोठ्या भारतीय निर्मात्यांना दरवर्षी 85 कोटीहून अधिक लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. सुरुवातील 5 कोटी डोस प्रत्येक महिन्याला बनवले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात यात वाढही करण्यात येणार आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतन म्हणाले की, त्यांच्या मुलीनं या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सोबतच या लसीला 59 देशांमध्ये वापरासाठी परवानगी मिळाली आहे भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. अशात आरोग्य सुविधांचा मोठी तुटवडा जाणवत आहे. या संकटाच्या काळात अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसह अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
COMMENTS