Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपयशाने वैफल्यग्रस्त न होता आनंदाने जगा ः रामदास फुटाणे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः जग हे खूप सुंदर असून, फक्त जीवनाकडे सकारत्मकतेने बघावे. केवळ मिळालेल्या पदवीवर अवलंबून न राहता जगण्याचे एकापेक्षा अधिक पर्

कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात
निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी चक्का जाम आंदोलन
सेवाभावी पुरस्कार आणि ग्रंथप्रकाशनच खरे पुण्यस्मरण ः काका कोयटे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः जग हे खूप सुंदर असून, फक्त जीवनाकडे सकारत्मकतेने बघावे. केवळ मिळालेल्या पदवीवर अवलंबून न राहता जगण्याचे एकापेक्षा अधिक पर्याय राखावेत. अपयशाने खचून तरुण आत्महत्या करतात हे योग्य नसून अपयशाने खचून न जाता आनंदाने जीवन जगावे असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले.
अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालय व भास्करराव गलांडे पा.आय.टी.आयच्या संयुक्त स्नेसंमेलनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून फुटाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे होते. कार्यक्रमास प्रसिद्ध कवी भरत दोंडकर उपस्थित होते.यावेळी अशोक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मंजुश्रीताई मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्री.फुटाणे यांनी काही वाञटिका तसेच कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.तसेच विद्यार्थ्यांना यशाचा कानमंञ दिला.श्री.भरत दोंडकर यांनीही सद्यस्थितीवर भाष्य करणार्‍या कविता सादर केल्या.


             अध्यक्षिय भाषणात माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी विद्यार्थी जीवनात मनमुराद आनंद लुटला पाहिजे.भरपूर खेळा,कायम हसत राहा.आजचे विद्यार्थी हे देशाची भावी पिढी आहे.तेव्हा चांगले शिकून जबाबदार नागरिक बना आणि देश उभारणीसाठी प्रयत्नशील राहा असे ते म्हणाले. पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे व आयटीआय चे प्राचार्य रईस शेख यांनी अहवाल वाचन केले.यावेळी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये व परीक्षेमध्ये सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्हे, प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये स्टुडट ऑफ द इयर मेकेनिकल इंजिनिअर विभागाचा उमेश चौधरी व कॉम्पुटर विभागाची ची विद्या कांडेकर यांना तर  प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना चॅम्पियनशीप देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.  सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी समन्वयक प्रा. अरुण कडू व सहसमन्वयक प्रा.  प्रशांत धंद्क व इतर शिक्षकानी परिश्रम घेतले.  प्रा. अरुण कडू यांनी मांडलेल्या अध्यक्षिय सुचनेस  प्रा. अनंत खंडागळे यांनी अनुमोदन दिले. तर अतिथी परिचय प्रा. महेश नवपुते यांनी केले. प्रा. दत्तात्रय झुराळे यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS