शेगाव प्रतिनिधी - राज्यातील मोठ देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकार कडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक,अध्
शेगाव प्रतिनिधी – राज्यातील मोठ देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकार कडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक,अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकरवर उभारणी केली होती. आनंद सागरमुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक व पर्यटन वाढलं होत. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आनंद सागर हे दीड ते दोन महिन्यात भाविकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन महिन्यात आनंद सागर सुरू होऊ शकत. आता याठिकाणी बंद असलेल्या आनंद सागरला दुरुस्त करून रंग रांगोटी करण्याची तयारी संस्थानाने सुरू केली आहे. आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तशा आशयाचे संदेश देखील समाज माध्यमात फिरताना दिसत आहे. मात्र आता काही महिन्यातच आनंद सागर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.
COMMENTS