Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उस्माननगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेक ठिकाणी अभिवादन

उस्माननगर प्रतिनिधी - बोधीसत्व, प्रज्ञासुर्य , भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिना निमित्त उ

राहुल गवळीच्या कुटुंबियांना न्याय द्या
माजी आमदार के. पी. पाटील मविआच्या वाटेवर?
बोगस बियाण्यांचा गोरखधंदा; 59 लाखांचे सोयाबीन बियाणे जप्त

उस्माननगर प्रतिनिधी – बोधीसत्व, प्रज्ञासुर्य , भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिना निमित्त उस्माननगर परिसरातील ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
उस्माननगर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड , उपसरपंच शेख बाशीद , ग्रामसेविका सौ.शिंदे – माने ,देवरावजी सोनसळे , गोविंदराव भिसे , अशोक काळम पाटील ,आमिनशा फकीर ,आमिन आदमनकर , राहुल सोनसळे ,संजय वारकड , दत्ता पाटील घोरबांड , मारोती बी.घोरबांड , गंगाधर कांबळे , कमलाकर शिंदे , गंगाधर भिसे ,प्रा.विजयकुमार भिसे , यांच्या सह अनेक गांवकरी सदस्य उपस्थित होते.
सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप व नागवंशी. मित्र मंडळ व जयंती मंडळ यांच्या वतीने बस स्थानक येथे खिचडीचे वाटप
 करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनसळे , देविदास डांगे, भगवान राक्षसमारे, मन्मथ केसे, भगवान राक्षसमारे, नितिन लाटकर, शकील शेख, समता जोंधळे, मणिषा भालेराव, सोनकांबळे, यांच्या सह विद्यार्थी , शिक्षक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद के. प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे , मुख्याध्यापिका सौ. विद्या वांगे , यांच्या सह शिक्षिका,शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. व येथील माजी सरपंच प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर यांच्या वाढदिवसानिमित्त आभिष्ठचितन करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, माणिक भिसे, प्रदीप देशमुख, लक्ष्मण कांबळे, सुर्यकांत मालीपाटील, देविदास डांगे , पोलीस पाटील विश्वभंर मोरे ,आमिन आदमनकर, राहुल सोनसळे ,सम्यक कांबळे , अशोक काळम पाटील, दत्ता पाटील घोरबांड , यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी समयोचीत भाषणे झाली.उस्माननगर परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी हार्षउल्हासाने उत्साहात साजरी करण्यात आला.

COMMENTS