Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार भाजपमध्ये जाणार ः अंजली दमानिया

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्य

 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार व खासदारांविरोधात आंदोलन
मोफत मिळणारे धान्य वाटप न करता केला काळा बाजार l पहा LokNews24
विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचा आर-पारचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करुन हा दावा केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाल्याचे बघायला मिळाले.  
ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची. राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्याचाच संदर्भ देत सरकारमधून 15 आमदार बाद होणार, असा दावा अंजली दमानिया केला आहे. शिंदे गटाचे 15 आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकार अल्पमतात येईल व महाराष्ट्रासारखे मोठे राज्य गमावणे भाजपला परवडणारे नाही. अशात भाजप अजित पवारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल व सरकार वाचवण्यासाठी काही आमदारांसह अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

COMMENTS