बीड प्रतिनिधी - तेलंगाना येथील भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के सी आर यांच्या बी आर एस पक्षाने महाराष्ट्र मध्ये पाऊल ठेवले आहे मरा

बीड प्रतिनिधी – तेलंगाना येथील भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के सी आर यांच्या बी आर एस पक्षाने महाराष्ट्र मध्ये पाऊल ठेवले आहे मराठवाड्यासारख्या भागातील बीड सारख्या ठिकाणीही बी आर एस चे कार्यकर्ते वाढू लागले आहेत महाराष्ट्र समन्वयक सुधीर बिंदू यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे कार्यकर्त्यांची बैठक व कार्यकर्ता प्रवेश सोहळा संपन्न झाला.
बी आर एस पक्षाची बीडमध्ये पाय मुळे मजबूत होत आहे विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केला शहरातील शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला प्रदेशाचे समन्वय सुधीर बिंदू यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली यामध्ये बीड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री के सी आर यांच्या नेतृत्वाखाली बी आर एस मध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा समन्वयक म्हणून विनोद पाटील यांना काम करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रवेश झालेल्या युवकांमध्ये सतीश मस्के पाटील, गजानन वाले ,गणेश जगताप, जमदाडे पैलवान ,रामेश्वर टिपरे सुरेश गुंड ,अक्षय यादव ,योगेश यादव आदींची उपस्थिती होती.
COMMENTS