Homeताज्या बातम्याक्रीडा

 RCB च्या पराभवानंतर कॅप्टन डू प्लेसिसला लाखांचा दंड

बेंगलोर प्रतिनिधी - आयपीएल २०२३ मधील सोमवारी खेळलेला सामना आरसीबीसाठी कधीही न विसरणारा असेल. २१२ धावांची विशाल धावसंख्या उभारूनही आरसीबीने ल

Sangamner : महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतूजा राहाणेला कांस्य पदक (Video)
पाऊस व पराभवाने केले टिम इंडियाचे द.आफ्रिकेत स्वागत
महिला T-20 लिग मालामाल

बेंगलोर प्रतिनिधी – आयपीएल २०२३ मधील सोमवारी खेळलेला सामना आरसीबीसाठी कधीही न विसरणारा असेल. २१२ धावांची विशाल धावसंख्या उभारूनही आरसीबीने लखनऊविरुद्धचा सामना फक्त एका विकेटने आणि शेवटच्या चेंडूवर जिंकला. लखनऊने हा सामना जिंकल्यानंतर आरसीबीच्या संघ चांगलाच हिरमुसला होता. पण आता यानंतर आरसीबीला अजून एक धक्का मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सोमवारी झालेला हा सामना चांगलाच रंगतदार झाला पण आता या सामन्याचा चांगलाच फटका दोन्ही संघांना बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊने शेवटच्या चेंडूवर एक विकेटने सामना जिंकला, त्यानंतर त्यांचा मैदानावरील खेळाडू आवेश खानने उत्साहात त्याचे हेल्मेट हवेत फेकले. यासाठी त्याला सामनाधिकारींनी फटकारले.

COMMENTS