भारताला मदत करण्यास अमेरिका कटिबद्ध : राष्ट्रपती जो बायडन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताला मदत करण्यास अमेरिका कटिबद्ध : राष्ट्रपती जो बायडन

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात भारतात निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीची तीव्रता लक्षात घेत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि उप- राष्ट्रपती कमला हॅरिस यांनी चिंता आणि सहानुभूती व्यक्त केली.

निलंबन रद्द करण्याचा निर्णय असंवैधानिक : अ‍ॅड. आंबेडकर
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन
पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ओंकार दळवी

वॉशिंग्टन : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात भारतात निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीची तीव्रता लक्षात घेत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि उप- राष्ट्रपती कमला हॅरिस यांनी चिंता आणि सहानुभूती व्यक्त केली. दोन्ही मान्यवरांनी संदेशाद्वारे भारताला कोरोनाच्या दुस-या लाटेशी सामना करण्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या.

ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्र्पती जो बायडन म्हणाले, “आमच्या रुग्णालयावर मोठा भार असताना ज्याप्रमाणे भारताने संकटाच्या काळात अमेरिकेला मदत केली, त्याचप्रमाणे गरजेच्या प्रसंगात भारताला मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तर उप- राष्ट्रपती कमला हॅरिस म्हणाल्या, ” कोरोना संकट काळात त्वरित आणि अधिक मदत आणि सामग्री पुरविण्यासाठी अमेरिका भारत सरकारसोबत कार्यरत आहे. आमच्या सामग्रीसोबत भारताच्या नागरिकांसाठी विशेषतः शूरवीर आरोग्य कार्यकर्त्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो आहे.”

COMMENTS