Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनुर गावातील जल जीवन चे कामे बोगस; चौकशी करण्याची मागणी

बीड प्रतिनिधी - माजलगाव तालुक्यातील मनुर या गावात हर घर नल से जल अंतर्गत जल जीवन मिशन हे काम होत आहे. आपले परिपत्रक दि. 20 जानेवारी 2023 ला पत्र

 काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना सांभाळलं पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ 
भाजपचे धक्कातंत्र !
आनंदाचा शिधा विलंबाने गरिबा घरी दिवाळीनंतर फराळ होणार

बीड प्रतिनिधी – माजलगाव तालुक्यातील मनुर या गावात हर घर नल से जल अंतर्गत जल जीवन मिशन हे काम होत आहे. आपले परिपत्रक दि. 20 जानेवारी 2023 ला पत्र जा. क्र. /मविशा-4/04/22/प्र.क्र.17/2022/ ी: 2273 137 च्या अनुषंगाने ग्रा.पं. ग्रामसेवक / सरपंच यांना जे आपण निर्गमित केलेले आदेश 13 क्षेत्रीय तपासणी (ऋढघ) जिल्हा व पाल्य स्वच्छता मिशनच्या माध्यमातुन कार्यवाही करण्यात यावी. त्यावर ग्रा.पं.चा भ्र. पण नाही. पाणी गुणवत्ता सहनियंत्रक प्रशिक्षीत महिलांचा सन्मान नाही.
ग्रामसभेत जलजीवन मिशन अंतर्गत सर्व कामांचा आढावास, कामाचे स्वरूप हे सुध्दा ओळख करून दिली नाही. उलट विचारणा केली असता त्या सरपंच/ म्हणतात की, आम्हाला या कामाविषयी काहीच माहिती नाही. असे लेखी दिले आहे.तसेच जलजिवन मिशनचे काम संबंधित कंत्राटदाराने चार दिवसात 1 ते 1.5 फुट खोदुन 3 इंच पाईप टाकुन बुजुन घेतले आहे. एक मिटरपर्यंत खड्डे आसताना  1 ते 1.5 फुटताच 5 इंच पाईपलाईन न लावता एकदम निकृष्ट दर्जाचे 3 इंच पाईप गाडुन टाकले आहेत. जलजिवन मिशन अंतर्गत काम हैं अत्यंत भ्रष्ट पध्दतीने होत आहे. त्या कामाची माहिती इंजिनिअर यांना सुध्दा नाही म्हणून साहेबांना  वेळीच दखल घेवून तात्काळ संबंधित कंत्राटदार व ग्रामपंचायतवर जनतेस धरणार्‍या मुजर अधिकारी व पदाधिकारी, गुत्तेदार यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलुन बोगस व थातुर मातुर कामे करत आहेत म्हणुन कार्यवाही करावी तसेच जोपर्यंत या कामाची चौकशी बेअरींग, खोली,लांबी रुंदी, पाईप साईज सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत या कामाचे बील अदा करण्यात येवु नये अशी लेखी तक्रार युवा आंदोलन महासंघाचे अध्यक्ष अशोक ढगे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता, प्रकल्प संचालक यांच्याकडे केली आहे.

COMMENTS