Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मरणार्थ  वडगांव कळसंबर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

चांगल्या आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा ; प्रत्येक विद्यार्थ्यांने एक छंद जोपासणे गरजेचे आहे-डॉ.ज्योतिताई मेटे

बीड प्रतिनिधी - लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मरणार्थ व वडगाव कळसंबरचे सरपंच श्रीमती सुशाला आसाराम मोरे यांचे चिरंजीव तथा शिवसंग्र

टीम इंडियाला प्रचंड मोठा धक्का। LokNews24
शिंदे गटात लवकरच स्फोट होईल
नव्या वर्षात नवे निर्बंध…आता उपस्थिती फक्त 50 ; प्रशासनाचा निर्णय

बीड प्रतिनिधी – लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मरणार्थ व वडगाव कळसंबरचे सरपंच श्रीमती सुशाला आसाराम मोरे यांचे चिरंजीव तथा शिवसंग्राम नेते ड.गणेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी  ग्रामपंचायत सदस्य , शिवसंग्रामचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील महिला – भगिनी व क्रिकेटप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते .

लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मरणार्थ  वडगांव कळसंबर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले गेले . या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी डॉ. ज्योतीताईंनी मनोगत व्यक्त करताना युवापीढीने वाईट व्यसनपासून परावर्त व्हावे,असा संदेश दिला तसेच आज योगायोगाने स्व.मेटे साहेबाचा मासिक दिन असून त्यांनी नेहमीच युवकांच्या व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र प्रयत्न केले होते.त्यामुळे साहेबांच्या शिकवणीनुसार युवकांनी चांगल्या गोष्टीचे व्यसन करावे.शिस्तबद्ध जीवनशैलीचे अनुकरण करावे. तसेच प्रत्येक व्यक्तीने आनंदी जीवन जगण्यासाठी कोणत्याही एका खेळाचा छंद जोपासणे गरजेचे आहे . ज्यामुळे शारीरिक आरोग्य ठीक राहते तसेच आनंदी जीवन जगताना व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन बनतो .

यासाठी मैदानी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे .असेही मत व्यक्त केले.या उद्घाटन प्रसंगी क्रिकेट खेळण्याचा मोह जिल्हाध्यक्ष नारायण दादा काशीद व जिल्हा सरचिटणीस अनिल भाऊ घुमरे यांना आवरता आला नाही. त्यांनी मनमुराद क्रिकेटचा आनंद घेतला .स्व.विनायकराव मेटे साहेबांनी बीडकरांसाठी अत्याधुनिक कुस्त्यांचा आराखडा व्हावा यासाठी विधान परिषदेत मागणी केली होती. लाल माती जोपर्यंत अंगाला लागत नाही तोपर्यंत शरीर बलदंड व निरोगी होत नाही. कुस्तीच्या माध्यमातून आपले कौशल्य जगाला दाखवण्याची एक संधी खेळाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. तसेच मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो यासाठी खेळ महत्त्वाचे आहे असे ते नेहमी म्हणत असत. जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी यावेळी स्वर्गीय मेटे साहेबांची आठवण सांगितली की, ग्रामीण भागातल्या खेळाडूंची एखाद्या स्पर्धेमध्ये निवड झाली अथवा एखादी टीम जिंकली तर स्व. मेटे साहेब आवर्जून त्यांना बोलावून घेत असत अथवा त्यांच्याकडे जावून कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर टाकत असत . यामधून त्या खेळाडूंना पुढे झेप घेण्यासाठी प्रचंड ऊर्जा व प्रेरणा मिळत असे. अ‍ॅड. गणेश मोरे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने उपस्थीत सर्वांचे आभार व्यक्त करतांना आपले  दुर्दव आहे की आज साहेब आपल्यातून निघून गेले आहेत,

आपली ताकत आपला स्वाभिमान,आपली बळ अस्त पावले आहे तरी परंतु याही परिस्थीतीत आपलं कौतुक करण्यासाठी डोंगराएवढे दुःख डॉ.ज्योतिताई बाजूला ठेवून सर्वसामान्याच्या दुःखात सहभागी होत आहेत . सर्वसामान्य महिला – भगिनी , विद्यार्थी , नागरिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी आज त्या प्रयत्न करताना दिसून येतात . याचाच एक भाग म्हणून आज या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्या असे मत ड. गणेश मोरे यांनी व्यक्त केले .याप्रसंगी वडगाव कळसंबरचे सरपंच श्रीमती सुशाला आसाराम मोरे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायनदादा काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, नितीनजी लाठकर, बाळासाहेब खोसे, बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, युवक प्रभारी प्रा.सुभाष जाधव सर, श्रीराम घोडके, दशरथ भोसले,विनोद कवडे, शिवसंग्राम नेते ज्ञानेश्वर कोकाटे,युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे, किसान आघाडीचे राजेंद्र आमटे, युवा नेते शैलेश सुरवसे,माजी सभापती मनीषाताई कोकाटे, महिला आघाडी गेवराई तालुकाध्यक्षा साधनाताई दातखिळ, बीड शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, रेखाताई तांबे तसेच वडगाव कळसंबर पंचक्रोशीतील खेळाडू ,क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS