Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी एस.एम.युसूफ़ यांची नियुक्ती

बीड प्रतिनिधी- शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली

इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्काचा वाद शरद पवारांच्या कोर्टात
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राज्यातील 110.39 लाख लाभार्थींना रक्कम रू. 23607.94 कोटी लाभ अदा
तृणमूल काँगे्रसचे साकेत गोखलेंना अटक

बीड प्रतिनिधी- शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.
एस.एम.युसूफ़ हे मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी पत्रकारिता करताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक मुद्दे मांडण्यासह पोलीस विभागात कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकार्‍यांसाठी सुद्धा शासन-प्रशासन दरबारी अनेक प्रश्न व मुद्दे मांडलेले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पोलीस वसाहतीमध्ये पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांना चांगली घरे मिळावी. वसाहत परिसरामधील रस्ते व नाल्या चांगल्या दर्जाचे असावे. परिसर स्वच्छ व सुंदर असावे. वसाहतीमध्ये  नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा. पोलिसांना 24 तासांऐवजी इतर शासकीय-प्रशासकीय विभागांप्रमाणे फक्त 8 तासांची ड्युटी असावी. वॉरंट किंवा समन्स बजावताना तसेच कैद्यांची व मानवी शरीराचे अवयव प्रयोगशाळेत ने-आण करताना पोलिसांना एस.टी. महामंडळाच्या बसेसने प्रवास करावे लागते, यामुळे एस.टी.बसेस मध्ये आमदार, खासदार, महिला, वृद्ध, अपंग यांच्यासारखे पोलिसांसाठीही किमान 2 आसन राखीव असावे. यासारखे प्रश्न पोलिसांसाठी आतापर्यंत शासन-प्रशासन दरबारी निवेदनाच्या माध्यमातून वेळोवेळी मांडलेले आहेत. शिवाय या मुद्द्यांना प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा वाचा फोडलेली आहे. एस.एम.युसूफ़ यांनी पोलिसांसाठी आतापर्यंत केलेल्या कार्याची नोंद घेत अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना च्या बीड जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदुरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, प्रसिद्धी प्रमुख सोपणे मामा यांनी एक मताने नियुक्तिपत्र दिले असून पत्रकारिता करताना पोलिसांसाठी जसे आज पर्यंत कार्य केले त्यापेक्षा जास्त कार्य आता संघटनेच्या माध्यमातून पोलिसांसाठी करावे असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर यांनी म्हटले आहे. यावर युसूफ़ यांनी निश्चितच करू असे म्हणत पोलिसांसाठी तळमळ असलेल्या तरुणांनी धडाडीने पुढे यावे. पोलिसांसाठी कार्य करण्यात स्वारस्य असलेल्या तरुणांना विविध पदावर नियुक्त करून संघटनेत कार्य करण्याची संधी देण्यात येईल. यासाठी जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष ही पदे तातडीने भरण्यात येतील. नंतर गाव, प्रभाग, वार्ड यासारखी तत्सम पदेही भरण्यात येतील. यासाठी संघटनेत कार्य करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांनी भ्रमणध्वनी क्रमांक – 9021 02 3121 वर संपर्क साधावा असे आवाहन एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.

COMMENTS