Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोली जिल्ह्यातील धान्य घोटाळा प्रकरणीतहसीलदार गजानन शिंदे आरोपीच्या पिंजर्‍यात

नांदेड प्रतिनिधी - धान्य घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार नायगावचे तहसीलदार  गजानन शिंदे हे आरोपीच्या पिंजर्‍यात असून त्यांच्यावि

शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले
 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
राजकोट किल्ल्यावर रविवारी जाणार ः मनोज जरांगे

नांदेड प्रतिनिधी – धान्य घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार नायगावचे तहसीलदार  गजानन शिंदे हे आरोपीच्या पिंजर्‍यात असून त्यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी हिंगोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निर्मला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक एस. एस. आमले हे पुढील तपास  करत आहेत.


स्वस्त धान्य दुकानदारांना ज्यादा धान्य दिल्याप्रकरणी नायगावचे विद्यमान तहसीलदार गजानन शिंदे यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस कारवाई अन्याय कारक  असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे  यांचे स्पष्टीकरण आहे. मात्र हा धान्य घोटाळा  33 लाखाचा असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात स्वस्त धान्य दुकानदारांना ज्यादा धान्य एकदा नव्हे तर अनेक वेळा वाटप करण्यात आले होते.पण आता या घटनेस बराच कालावधी लोटला गेल्यामुळे गुन्ह्याची तीव्रता कमी झाली असल्याने तहसीलदार गजानन शिंदे यात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मते दोसी आहेत. या पाश्र्वभूमीवर प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या धान्य घोटाळा प्रकरणी ज्यादा धान्य उचलल्यामुळे काही स्वस्त धान्य दुकानदारांनी पैसे भरले आहेत आणि काही जण भरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.  गुन्हा नोंद झाल्यामुळे हे प्रकरण न्याय प्रविष्ट झाले आहे .या पाश्र्वभूमीवर सन्माननीय न्यायपालिका काय निर्णय  देईल. याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी हिंगोली येथे कार्यरत असताना कार्यालयाच्या पुरवठा विभागातून सन 2019 जानेवारी ते 2019 च्या जुलै सहा महिन्याच्या कार्यकाळात ऑफलाइन धान्य वाटप केलेल्या प्रकरणात 147 आरोपी? होते त्यापैकी 116 स्वस्त धान्य दुकानदारानी पैसे भरले आणि 16 दुकानदारानी पैसे भरले नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचे प्रकरण सन्माननीय न्यायपालिकेत दाखल  असल्याचे सांगण्यात येते .  नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून गजानन शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे ती सदरची कारवाई अन्याय कारक कशी? धान्य घोटाळ्याची कारवाई ही सर्व अभिलेखित तपासूनच करण्यात आली होती असे विभागीय  चौकशी पथकाच्या गोपनीय अहवालात असल्यामुळे पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात धान्य दुकानदारास ज्यादा अन्नधान्य वाटप करण्यात आल .या आरोपात काही तथ्य नसल्यास गजानन शिंदे हे निर्दोष सुटतील यात काही शंका नाही.पण या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त महसूल विभाग औरंगाबाद यांनी गजानन शिंदे यांच्या अडचणीत वाढ केली आहे.  हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक  एस. एस आमले यांनी आपली चौक कामगिरी बजावत फिर्यादी घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक एस. एस आमले यांनी दिली आहे. याप्रकरणी तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह अव्वल कारकून, आणि स्वस्त धान्य दुकानदार पी. आर गरड. ज्ञानेश्वर मस्के. विनोद आडे. एस के पठाण .डी एम शिंदे ,मिलिंद पडघन .गणाजी बेले, गोपाल तापडिया ,डी बी चव्हाण. गजानन गडदे ,गोविंदा मस्के. पतंगराव मस्के व अन्य आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्याची जबाबदारी तपास अधिकारी यांच्याकडे आहे अशीही पोलीस सूत्रांनी माहिती दिली. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक एस. एस आमले. सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवराव जिव्हारे  यांनी स्वस्त धान्य त्या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS