नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते किरणकुमार रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलाय. केरळमधील दिग्गज न
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते किरणकुमार रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलाय. केरळमधील दिग्गज नेते ए.के. अँथोनी यांचा मुलगा अनिल अँथोनी याने गुरुवारी भाजपात प्रवेश घेतल्यानंतर सलग दुसर्या दिवशी दक्षिण भारतात काँग्रेसला किरणकुमार यांच्या पक्षत्यागाने आणखी एक धक्का बसला आहे. रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. नेतृत्वाशी असलेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
पक्षाला सोडचिठ्ठी देताना रेड्डी म्हणाले की, ’काँग्रेस पक्ष जनतेचा कौल समजू शकलेला नाही. काँग्रेस पक्ष ना चूक काय आहे याचे विश्लेषण करत आहे ना त्यांना दुरुस्त करायचे आहे. तो बरोबर आहे आणि देशातील लोकांसह इतर सर्वजण चुकीचे आहेत असे त्याला वाटते. याच विचारसरणीमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस हायकमांडच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाची वाताहत होत आहे, ही एका राज्याची बाब नाही. एक जुनी कहाणी आहे की, माझा राजा खूप हुशार आहे, तो स्वतः विचार करत नाही आणि कोणाच्या सूचना ऐकत नाही. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हा सर्वांना कळले असेलच. विशेष म्हणजे, राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या राज्यात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसची सत्ता आहे. दक्षिण भारतीय राज्यांमध्ये विस्तार करु पाहणार्या भाजपसाठी रेड्डी यांचा प्रवेश फायदेशीर ठरु शकतो, असे मानले जात आहे.त्याचबरोबर, 2014 साली तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या काळात त्यांनी जय समैक्य आंध्र पक्ष हा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. तथापि, 2018 मध्ये ते तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात परतले. मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी मी काँग्रेसपासून फारकत घेऊ शकत नाही, रेड्डी त्यावेळी म्हणाले होते.
COMMENTS