Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी येथील पाळणा अपघातातील साळवे कुटुंबास 50 हजारांची मदत

शिर्डी प्रतिनिधी ः शिर्डी येथील यात्रेतील पाळणा अपघातात शनिवारी एका व्यक्तीच्या दोन्ही पायानां गंभीर इजा झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त

स्वतःच्या करिअरची जबाबदारी स्वतःच घेणार
*संजय घोडावत यांच्याकडे 5 कोटींची खंडणी l LokNews24*
श्रीरामपूर शहरात आता बुधवारी व शनिवारी पाणीपुरवठा राहणार खंडित

शिर्डी प्रतिनिधी ः शिर्डी येथील यात्रेतील पाळणा अपघातात शनिवारी एका व्यक्तीच्या दोन्ही पायानां गंभीर इजा झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत श्री साई संस्थानच्या प्रसादल्यासमोरील जागेत हे पाळणे लावण्यात आले होते त्यातील एक डान्सिंग पाळणा अचानकपणे तुटल्याने पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले त्यात ज्योती किशोर साळवे या महिलेचा डावा पाय फॅक्चर झाला आहे.
  किशोर पोपट साळवे यांच्या दोन्ही पायांना मोठी इजा झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्या दापत्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे जखमीना तातडीने संस्थांनच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. या दुर्घटनेत सापडलेल्या साळवे कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत गरीबीची,हलाकीची असून त्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषासह संपुर्ण कुटुंबच दुःखात सापडल्याने पुढील उपचारासाठी त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार आर्थिक मदतीसाठी नागरिकांना आवाहन करत आहे याच आवहानाला प्रतिसाद देत शिर्डी येथिल सामाजिक कार्यकर्ते योगेश शेठ तिया यांनी साळवे कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे योगेश शेठ तिया यांना साळवे कुटुंबास मदतीची गरज असल्याचे कळताच आपल्या परिने स्वतः पुढे येत एवढी रक्कम दिल्याने सर्व नातेवाईकांसह शिर्डी व परिसतील नागरीकांनी त्यांचे आभार मानत योगेश शेठ तिया यांचे सर्वञ कौतुक होत आहे या विषयी त्यांनी बोलतांना सांगितले की साळवे कुटुंबावर जी वेळ आली आहे ती नक्कीच दुर्दैवी आहे यातुन त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्या सर्वांच्याच मदतीची गरज आसुन आपण सर्वांनी पुढे येऊन त्यांना मदत करण्याचे अवाहन योगेश शेठ तिया यांनी केले आहे.

COMMENTS