Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णा महाराज आहेर यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

चौथे उपोषण अधिकार्‍याने पाठ फिरवल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक

चकलांबा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे 15 ऑगस्ट नंतर मंडळ अधिकारी व सार्वजनिक बांधकामात विभाग गेवराई यांच्या लेखी आश्वासने स्थगित उप

भाजपकडून या 99 उमेदवारांना संधी
छताचे प्लास्टर कोसळून 5 वर्षीय मुलीचा मृत्यू
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 3 लाचखोरांना सीबीआयकडून अटक

चकलांबा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे 15 ऑगस्ट नंतर मंडळ अधिकारी व सार्वजनिक बांधकामात विभाग गेवराई यांच्या लेखी आश्वासने स्थगित उपोषण पुन्हा 26 आक्टोबर रोजी त्याच मुद्द्यावर उपोषण पुन्हा 28 ऑक्टोंबर रोजी मंडळ अधिकारी लेखी आश्वासन व तहसीलदार यांच्या फोन द्वारे संबंधित सर्व कार्यालयातील अधिकार्‍याची बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येतील हे आश्वासन वर स्थगित परंतु पुन्हा तहसीलदार यांनी बैठक न लावल्यामुळे 26 जानेवारी रोजी पुन्हा 30 जानेवारीपर्यंत चार-पाच दिवस त्याच विषयावर उपोषण नंतर पुन्हा तहसीलदार यांनी स्वतः संबंधित सर्व अधिकार्‍यांशी बैठक घेऊन तात्काळ विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडले परंतु आजपण तहसीलदार यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही यामुळे पुन्हा एक एप्रिल रोजी पुन्हा त्याच 26 ज्वलंत मागण्यासाठी बेलेश्वर संस्थान येथे अण्णा महाराज आहेर यांनी तहसीलदार यांना लेखी  निवेदन देऊन उपोषण करणार इशारा दिला होता.
प्रमुख मागण्या  रस्तालाईट,जि.शाळेची नवीन इमारत, आरोग्य उपकेंद्रातील सर्व रीक्त पदें भरून नवीन इमारत बांधुन 24तास आरोग्य सेवा देण्यात यावी, बंद केलेले बेलेश्वर संस्थान येथे सभा मंडप व सिंगल फेज लाईट देण्यात यावी श्रावणबाळ संजय गांधी योजनेतील प्राप्त अर्जदारांना योग्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, एपिक पेरा ऑफलाइन करण्यात यावा ची शाखा करण्यात येईल या संविधान मागण्यासाठी एक एप्रिल पासून उपोषण सुरू असून अद्याप या उपोषणाकडे संबंधित सर्व अधिकारी पाठ फिरवली असून तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरणार असल्याचे इशारा दिला आहे यावेळी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यासह खळेगाव,धुमेगाव,महारटाकळी सह परिसरातील नागरिक  संतप्त होत प्रतिक्रिया देत रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS