हदगाव प्रतिनिधी - आईच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुलीने ’आई माझे कसे होणार , म्हणत असा हंबरडा फोडला आणि जागेवरच मरण पावली असल्याची दुर्दैवी घटना त

हदगाव प्रतिनिधी – आईच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुलीने ’आई माझे कसे होणार , म्हणत असा हंबरडा फोडला आणि जागेवरच मरण पावली असल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील तामसा येथे घडली.
या दुर्दैवी घटनेची सविस्तर माहिती अशी , तामसा ता.हादगाव येथील गयाबाई किशनराव शेवाळकर यांचे परवा वर्धक काळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी अनेक गावचे पाहुणे मंडळी हजर झाले होते. मयत महिलेची मुलगी जयमाला जाधव रा. येवली ता. हदगाव जि. नांदेड या ही त्यांच्या सासरवरून माहेरी तामसा येथे आल्या शोक सागरात त्यांनी येऊन मृतदेहाला कवटाळून आई माझे आता होणार, म्हणून हंबर्डा फोडला व जागेवर चक्कर येऊन पडल्या तेव्हा जवळच असलेल्या खाजगी दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरने जयमाला जाधव मृत्यू झाले असल्याचे घोषित केले .एकाच दिवशी मायलेकीची अंतयात्रा काढण्यात आली .सदर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मयत मुलगी जयमाला जाधव रा. येवली हिचे काही दिवसापूर्वी सासू-सासरे वारले व आठ महिन्यापूर्वी तिच्या पतीचेही निधन झाले .त्यामुळे ती तणावग्रस्त होती असे ऐकावयास मिळाले.
COMMENTS