जेऊर आणि चिचोंडी पाटील कोविड केअर सेंटरसाठी १५ बेडस् कायमस्वरुपी भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेऊर आणि चिचोंडी पाटील कोविड केअर सेंटरसाठी १५ बेडस् कायमस्वरुपी भेट

 केडगाव (तालुका नगर) येथील अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरला 15 बेड वितरण करण्यात आले.

निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी चक्का जाम आंदोलन
दुष्काळ सदृश्य परिस्तिथीमुळे आ.आजबेंचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा
डेल्टाचे जिल्ह्यात आढळले चार रुग्ण

अहमदनगर: केडगाव (तालुका नगर) येथील अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरला 15 बेड वितरण करण्यात आले. जेऊर आणि चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळून १५ चांगल्या दर्जाचे बेड कोविड सेंटरला कायमस्वरूपी भेट देण्यात आल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

नेवासा येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक अशोक कुटे व अरणंगाव येथील उद्योजक गोरख गहिले यांनी ही मदत केली. पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक प्रभाकरराव शिंदे आणि काकासाहेब शिंदे यांनी नेवासा कोविड सेंटरला 100 बेड, २ मिनी अँम्बुलस, २० नवीन ऑक्सिजन सिलेंडर कायमस्वरूपी भेट दिले होते. ती प्रेरणा घेऊन या दोघांनी मोठ्या प्रमाणात बेड व इतर मदत भेट देण्यासाठी सोशल मीडियावर  आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला

COMMENTS