Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरात साई भक्तां कडुन धिरेंद्र शास्ञीच्या तैलचिञाची होळी  

बागेश्वर बाबा उर्फ धिरेंद्र शास्ञी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

देवळाली प्रवरा प्रतिनिधी/ बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी किही दिवसापुर्वी संत तुकाराम महाराज यांच्या बद्

शासनाच्या पेन्शन समिती आदेशाची केली होळी…
राहात्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
Ahmednagar : शहरात गुंडाराज… दहा जणांच्या टोळक्याचा धुडगूस… चाकूने मारण्याचा प्रयत्न… (Video)

देवळाली प्रवरा प्रतिनिधी/ बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी किही दिवसापुर्वी संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्याच बाबाने  साईबाबां विषयी केलेल्या वक्तव्याचे देवळाली प्रवरात तीव्र पडसाद उमटले आहे. येथिल साई प्रतिष्ठानच्या वतीने बागेश्वर बाबा यांचे तैलचिञ होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला. या ढोंगी बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी साई भक्तांनी केली आहे. देवळाली प्रवरा येथिल नागरीकांनी 

बागेश्वर बाबा यांने साईबाबांच्या मुर्ती समोर येवुन जाहिर  माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, याप्रकरणी आज देवळाली प्रवरात शेतकरी पुतळ्या समोर  बागेश्वर बाबाचा निषेध करुन तैलचिञाची होळी करण्यात आली. यापूर्वीही त्यांने संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर त्याला माफी मागावी लागली होती.

             सतत वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहणाऱ्या व प्रसिद्धीच्या खटाटोपापायी टीकेचे लक्ष्य होत स्वतःला हिंदुत्ववादी राष्ट्रीय संत म्हणविणाऱ्या बागेश्वर बाबा याच्या विरोधात देवळालीकर संतप्त भावना व्यक्त केल्या. बागेश्वर बालाजी धामचे धिरेंद्र शास्त्री याने सद्गुरू साई बाबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर साईभक्त तीव्र संताप व्यक्त करीत आहे.साई नामाचा जयघोष करीत श्री साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर आरती करण्यात आली. त्यानंतर धिरेंद्र शास्त्री या भोंदू बाबा विरोधात निषेधाच्या घोषणा देवुन तैलचिञाची होळी करण्यात आली.

            यावेळी राजेंद्र चव्हाण म्हणाले की,धिरेंद्र शास्त्री या भोंदू बाबा आहेत.जर हे खरोखर शास्ञी असते तर यांनी दुसऱ्यांदा वादग्रस्त वक्तव्य केले नसते.वादग्रस्त वक्तव्य करुन प्रसिद्धीच्या येण्यासाठी कोणत्याही संतावर वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने यांचा नुसता निषेध करुन उपयोग नाही.तर जेलची हवा खायला पाठविले पाहिजे असे चव्हाण यांनी सांगितले.

            यावेळी पांडू मुसमाडे, राजेंद्र चव्हाण,आनंद कदम,दिपक ञिभुवन आदींनी आपल्या भाषणातुन निषेध केला.

             यावेळी माजी नगरसेवक शैलेंद कदम, अँड प्रशांत मुसमाडे,योगेश रहाणे, आनंदा कदम,मच्छींद्र कराळे,संदिप कदम,सुखदेव होले,डाँ रविंद्र भांड,विशाल कडू,सतिष म्हस्के,रंगनाथ मुसमाडे आदी उपस्थित होते 

COMMENTS