Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेड विद्यालयाच्या प्राचार्यपदी गोरक्ष भापकर

बाळासाहेब काळे पर्यवेक्षक

कर्जत प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व डॉ. जी. डी. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदाचा

सहकार बळकटीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न-बिपीनदादा कोल्हे
बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
राहुरी फॅक्टरीत महावितरण अधिकार्‍यास मारहाण

कर्जत प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व डॉ. जी. डी. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदाचा कार्यभार गोरक्ष भापकर त्यांनी घेतला. चंद्रकांत चेडे हे सेवानिवृत्त झाल्याने भापकर यांना पदोन्नती देण्यात आली. पर्यवेक्षकपदी बाळासाहेब काळे यांना पदोन्नती देण्यात आली. शनिवारी भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण सप्तर्षी, रमा सप्तर्षी, युक्रांदचे आप्पा अनारसे यांनी नवनियुक्त प्राचार्य व पर्यवेक्षक यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करून वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवावेत, असे संस्था पदाधिकार्‍यांनी सुचित केले. प्राचार्य भापकर यांनी डॉ कुमार सप्तर्षी व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक व शिक्षकांच्या सहकार्यातून गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. संदीप भिसे यांनी केले. यावेळी पालक हभप रामदास महाराज मोरे, अजिनाथ ढवाण, भागवत जाधव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


वाचन उपक्रम / युवक क्रांती दलाचे परिवर्तन वाचनालय व विद्यालयातील ग्रंथालय विभाग यांच्यावतीने विद्यालयात नियमितपणे वाचन उपक्रम राबविण्याचे जाहीर केले. विद्यार्थिनी श्रावणी भांडवलकर हिच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वयोगट व अभिरुचीचा विचार विविध प्रकारची पुस्तके बुक स्टँडवर सहजपणे वाचता येतील अशी ठेवण्यात आली आहेत. प्रा. किरण जगताप यांच्याकडे ग्रंथालय विभागाचा चार्ज देण्यात आला आहे.

COMMENTS