Homeताज्या बातम्यादेश

झारखंडमध्ये पाच माओवाद्यांचा खात्मा

रांची/वृत्तसंस्था : झारखंडच्या चतरा जिल्ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणांनी माओवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जवानांशी झालेल्या

ट्रान्सजेंडर कपलने दिली गुडन्यूज
मुंबईत 29.7 कोटी किंमतीचे कोकेन जप्त
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ देण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

रांची/वृत्तसंस्था : झारखंडच्या चतरा जिल्ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणांनी माओवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जवानांशी झालेल्या चकमकीत 25 लाखांचे बक्षीस असलेले दोन आणि पाच लाखांचे बक्षीस असलेल्या तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. झारखंडमधील चतरा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आली असून त्यानंतर आता पोलिसांनी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता झारखंडमध्ये तब्बल पाच माओवाद्यांना ठार मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
माओवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्याकडून दोन एके-47 सह शस्त्रास्त्र आणि सामग्रीही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. झारखंडमधील पलामू-चतरा सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी माओवाद्यांविरोधात मोठं अभियान सुरू केलं असून ही कारवाई अजूनही सुरूच असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईसाठी सुरक्षा यंत्रणांकडून सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, जॅप आणि आयआरबीच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. अन्य माओवाद्याचा शोध घेण्यासाठी चतरा येथील जंगलांमध्ये जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईत 25 लाखांचे बक्षीस असलेल्या गौतम पासवान आणि चार्लीस उरांव या दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोन्ही माओवादी स्पेशल एरिया कमेटीचे सदस्य असून अनेक कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय नंदू, अमर गंझू आणि संजीत या तीन माओवाद्यांवर पाच लाखांचं बक्षीस होते. हे तिन्ही माओवादी झोनल कमांडर होते. पाच माओवाद्यांच्या मृत्यूशिवाय 10 माओवादी सुरक्षा यंत्रणांच्या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे.

COMMENTS