Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिपळूण येथील सुभेदार अजय ढगळे शहीद

रत्नागिरी : भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्याचे काम करत असताना भुस्खलन झाल्यामुळे चिपळूण येथील जवान शहीद झाला. सुभेदार अजय ढगळे असे त्यांचे नाव आहे.

अहमदपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीने मारली बाजी
बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले
वंचितांना सत्तेत आणण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न

रत्नागिरी : भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्याचे काम करत असताना भुस्खलन झाल्यामुळे चिपळूण येथील जवान शहीद झाला. सुभेदार अजय ढगळे असे त्यांचे नाव आहे. बर्फ आणि मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ढगळे यांचे पार्थिव सोमवारी चिपळूणमधील मूळगावी चोरवणे आणण्यात येणार आहे. भारत-चीन सीमेवर रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. यावेळी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र आणि माजी सैनिक मुलांचे वसतिगृह चिपळूणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते. त्याचवेळी सततच्या पावसामुळे बर्फवृष्टीमुळे 24 मार्च रोजी सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे आणि त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले.याची माहिती मिळताच भारतीय सैन्य दलाने जवानांचे मृतदेह शोधण्याचे काम हाती घेतले. मागील सहा दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. बर्फवृष्टी सुरू असताना ही शोधमोहीम सुरू होती. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना अडथळा येत होता. पण जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून चिखल आणि मोठाले दगड बाजूला केले. अखेर सहाव्या दिवशी शहीद सुभेदार अजय ढगळे आणि इतर चार जवानांचे मृतदेह सापडले. शहीद अजय ढगळे कारगिल युद्धाच्या वेळी टायगर हिल जिंकणार्‍या टीममध्ये होते.

COMMENTS