Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपा मालेगाव जिल्हा सोशल मिडिया संयोजकपदी गौरव चंद्रात्रे यांची निवड  

सटाणा- भारतीय जनता पक्षाने येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकटीकरण करण्यासाठी सटाणा शहर भाजपचे पदाधिकारी गौरव

रशियन सैन्याने चुकून स्वतःच्याच देशात टाकला बॉम्ब
गुढीपाडव्यादरम्यान मंदिरात भक्तांसमोर पुजाऱ्याचा खून
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारिकरणाला येणार गती

सटाणा– भारतीय जनता पक्षाने येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकटीकरण करण्यासाठी सटाणा शहर भाजपचे पदाधिकारी गौरव नितिन चंद्रात्रे यांची मालेगांव जिल्हा भाजप सोशल मिडीया प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.

मालेगाव येथील भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस  सुरेश  सोनवणे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष  राकेश घोडे, तालुका सरचिटणीस  दिलीप खैरनार, बागलाण ता. किसान मोर्चा अध्यक्ष विलास सोनवणे व कार्यालय प्रमुख हे उपस्थित होते. निवडीनंतर चंद्रात्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व देवमामलेदार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पक्षाने दिलेली जबाबदारी एकनिष्ठेने पार पाडून पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS