बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्रीराम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त
बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्रीराम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त गावातील दीडशे युवक पैठण ते दादेगाव पर्यंत पायी कावडी घेऊन आले. श्रीराम प्रभूंना या कावडीच्या पाण्याने जलाभिषेक घालण्यात आला. कावडीला रंगबेरंगी फुलांनी आणि फुग्यांनी सजवण्यात आले असून कावडीची भव्य शोभायात्रा संपन्न झाली. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी 375 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली असून गंडकी शिळापासून या पंचायतन पाच मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. तर या कावड यात्रेला 375 वर्षांचा इतिहास आहे.
COMMENTS