Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत राम नवमी निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयेजन 

शिर्डी नगरी श्री राम नवमी निमीत्त दुमदुमली

  अहमदनगर प्रतिनिधी - श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साई सच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस

मनपा द्वारे नगर शहराचा पाणीपुरवठा राम भरोसे सुरू असल्याची कबुली.
2024 ला राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झालेले दिसतील – बाळासाहेब थोरात 
चायना मांजाने कापला पाच वर्षीय मुलीचा गळा

  अहमदनगर प्रतिनिधी – श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साई सच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणुकीत संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी वीणा, वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी यांनी श्रींची प्रतिमा घेवुन मिरवणूकीत सहभाग घेतला. याप्रसंगी संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सौ.मालती यार्लगड्डा, सौ.मिनाक्षी सालीमठ,  मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ उपस्थित होते. श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी कावडी पुजन करताना संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मालती यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.मिनाक्षी सालीमठ आणि प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव हे उपस्थित होते.

COMMENTS