Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राम नवमी निमित्त आयोजित प्रभू श्रीराम यांची जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या हस्ते आरतीचे आयोजन 

बुलढाणा प्रतिनिधी - श्रीराम जन्मोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे आगामी श्रीराम जन्मोत्सवाचे भव्य दिव्य

आजचे राशीचक्र मंगळवार,२१ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
युक्रेनची नाटो राष्ट्रांकडूनच फसवणूक !
फसवणुकीचा गोरखधंदा  

बुलढाणा प्रतिनिधी – श्रीराम जन्मोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे आगामी श्रीराम जन्मोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे.. त्यानिमित्त टॉवर चौकातील राजीव गांधी उद्यान येथे  आज सायंकाळी प्रभू श्रीरामाच्या आरतीचा मान पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांना देण्यात आला होता.विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम जन्मोत्सव आयोजन समिती तर्फे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सलग नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.. त्यातच आयोजन समितीकडून विविध समाज बांधवांकडून सकाळी व सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो.तर जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी आरती केली. तर नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.खामगांव शहरात श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात त्यामुळे या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर सर्वांनी श्रीराम जन्मोत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी केले आहे.

COMMENTS