नाशिक प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात महागाई ने प्रत्येक नागरिक हैराण झाले आहेत.यामध्ये केंद्र सरकार असो कि राज्य सरकार असो तर सर
नाशिक प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात महागाई ने प्रत्येक नागरिक हैराण झाले आहेत.यामध्ये केंद्र सरकार असो कि राज्य सरकार असो तर सरकारने आपापल्या राजकीय खुर्च्या टिकवण्यासाठी आमदार – खासदार यांच्या मानधनात प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्याच प्रमाणे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई नुसार भरमसाठ पगार दिला जातो आहे मात्र महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी ज्या लोककलावंत – साहित्यिक – किर्तणकार यांचे भरिव योगदान असुनही राज्य सरकार या कलावंतांकडे डोळझाक करत आहे. कलावंतांना जे मानधन दिले जाते ते अतिशय तुटपुंजे आहे कि त्या मानधनात वाढ करावी याकरिता वर्षानुवर्षे राज्य सरकार कडे कलावंत – साहित्यिक – किर्तणकार मागणी करूनही मात्र जाणून बुजून राज्य सरकार कलावंतांच्या मागण्या कडे दुर्लक्ष करत आहे.याकरिता राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना *महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती* ह्या संघटनेच्या शिष्टमंडळाने कलावंतांच्या मानधनात वाढ करावी याकरिता राज्यात जोर धरला आहे नुकतेच नाशिक जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. योगेश पाटील यांना प्रत्यक्ष भेट देऊन *”आमदार- खासदारांच्या प्रमाणे कलावंतांच्या मानधनात वाढ करावी”* अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.
याप्रसंगी *महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती* च्या वतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे कडे विविध शासकीय योजनेचा लाभ स्थानिक कलावंतांना हि द्यावा असा हि आग्रह धरला आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. आमदार – खासदार – अधिकारी – कर्मचाऱ्यांप्रमाणे कलावंतांच्या मानधनात वाढ न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकार विरोधात तिव्र आंदोलन करणार असल्याची भुमिका *महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती* च्या वतीने घेण्यात येणार आहे.
यावेळी शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष सिने अभिनेते रमेश जाधव, प्रदेश मुख्य संघटक शा.भाऊसाहेब चव्हाण, नाशिक ग्रामीण जिल्हाअध्यक्ष हभप धोंडीराम थैल, नाशिक महानगर जिल्हाअध्यक्ष हभप शांताराम दुसाने, निफाड तालुका उपाध्यक्ष मास्टर रतन वाघ,नाशिक शहर उपाध्यक्ष कवयत्री सौ.अंजली देशपांडे आदींचा समावेश होता.
COMMENTS