Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांना एस टी बस मध्ये 50 % सुट दिल्याच्या विरोधात टॅक्सी चालक संघटने कडून आंदोलन

बुलढाणा प्रतिनिधी - राज्य सरकारने महिलांना एसटी बस मध्ये दिलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या विरोधात आज खामगाव येथील काली पिली टॅक्सी संघटने करून

आरक्षणासाठी धनगर समाज मैदानात
वडोलीत शेतात वीज पडून बैल ठार
शेती धोरणाच्या हितासाठी कृषी कायदे ऐतिहासिक : मुनगंटीवार

बुलढाणा प्रतिनिधी – राज्य सरकारने महिलांना एसटी बस मध्ये दिलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या विरोधात आज खामगाव येथील काली पिली टॅक्सी संघटने करून नगर परिषद मैदान जवळपास 5 हजार ऑटो व टॅक्सी उभे करून काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी न.प मैदान वरून उपविभागीय कार्याल पर्यंत मोर्चा काढण्यात आला. काळी-पिवळी टॅक्सी संघटना ही एक पंजीबध्द संघटना असून खामगांव ते नांदूरा तसेच खामगांव वरून अनेक ठिकाणी  सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीकरीता काळी पिवळी धारकांची कायदेशिर संघटना आहे. आमची काळी-पिवळी टॅक्सी संघटना ही सर्व सामान्य जनतेच्य सोईकरीता नेहमीच कार्यरत आहे. तसेच आमचे संघटनेमध्ये बरेचशे सुशिक्षीत बेरोजगार व्यक्ती काळी-पिवळी टॅक्सी चालवून स्वतः व कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवितात. वास्तविक पाहता, आमची संघटना ही नांदूरा ते खामगांव दरम्यान प्रवासी वाहतुक कायद्याने लादून दिलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहून करीत आहेत. मागील काळात सर्वत्र लॉकडाऊन मुळे आमचा व्यवसाय बंद होता, त्या काळात सुद्धा शासनाने आम्हाला कोणत्याही अप्रकारची मदत केलेली नसून आम्ही आमचे हिमतीवर कसे बसे आमच्या परीवारचे संरक्षण करून उदरनिर्वाह केलेला आहे. त्यावेळी आमच्या पैकी बरेच सदस्य कर्ज बाजारी झालेले असून सदर कर्जाच्या ओझ्याखाली असून जीवन व्यथीत करीत आहे. तश्यातच आता महाराष्ट्र शासनाने आमची अजूनच अवहेलना करीत आमचा व्यवसाय हीरावून घेण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व महीलाना बस सध्ये अर्थ तिकीट, तसेच 65 वर्षावरील इसमाना अर्ध तिकीट व 75 वर्षावरील जनतेला फुकट भाडे आकारून खाजगी वाहतुक करणाऱ्या चालक मालकांवर अन्याय केला आहे. राज्य सरकारच्या अश्या निर्णयामुळे खाजगी वाहतुक करणाऱ्या चालक मालक याचे रोजगारावर विपरीत परीणाम होत असून त्यांना त्याचे खाजगी बसचा खर्च काढणे देखील मुश्किल झालेले आहे.. हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचे पुनर्वविचार करून आम्हाला न्याय मिळून देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

COMMENTS