Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

पाच हजार रुपये दंडाचीही शिक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी ः पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावल

‘दि चँपियन ऑफ दि चेंज’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा सत्कार
रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

अहमदनगर/प्रतिनिधी ः पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. आरोपी रवींद्र मोहन कोपरगे (वय 32 वर्षे , रा . इंदिरानगर, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी त्याला दोषी धरून भा.दं.वि. कलम 376, 376 (अ)(ब)(2)(आय)(जे) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 4 व 6 नुसार दोषी धरून प्रत्येक गुन्हयानुसार आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. विशेष म्हणजे या खटल्याचा निकाल हा अतिशय कमी कालावधीत म्हणजेच केवळ 9 महिन्यामध्ये लागला आहे.

या घटनेची हकीगत अशी की, दिनांक 1 जून 2022 रोजी रात्री 8 च्या सुमारास मौजे शेवगाव शहरातील इंदिरानगर येथील राहणारा आरोपी रवींद्र मोहन कोपरगे याने पाच वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीला मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेवून तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला. या घटनेची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने शेवगाव पोलिसांसमोर दिली. त्यानुसार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी, पिडीतेची आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वयासंदर्भात नगर परिषद पाथर्डीचे रजिस्टार क्लर्क अंबादास साठे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गहिनीनाथ खेडकर (सिव्हील हॉस्पिटल, अहमदनगर) यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज पाहणार्‍या विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांना पैरवी अधिकारी म्हणून राणी बोर्डे तसेच कॉन्स्टेबल विजय गावडे व खंडागळे यांनी सहकार्य केले.

तिच्या मनावरील ओरखडे कायम… – या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. केळगंद्रे-शिंदे यांनी युक्तीवाद केला की, या घटनेमधील मुलगी ही पाच वर्षे वयाची लहान चिमुरडी आहे. आरोपीने तिला विश्‍वासात घेवून त्याच्या घरी नेऊन तिच्याशी वाईट कृत्य केले आहे. घटनेनंतर पिडीत मुलीच्या बालमनावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. घटनेस नऊ महिन्याचा कालावधी होवून गेलेला असला तरीही आजही पिडीत मुलीच्या मनावर अतिशय तीव्र स्वरूपात परिणाम झालेला असून ती आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे. नुकतीच उमलत असलेल्या कळीवर आरोपीने असे हीन कृत्य करून तिचे संपूर्ण आयुष्य खुडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या केसमध्ये आरोपीस जास्तीतजास्त शिक्षा दिली तर समाजातील अशा विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत. या केसमध्ये सरकारी वकिलांनी पिडीत मुलीशी बोलून तिच्या मनातील भीती घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या घटनेमुळे तिच्या मनावरील ओरखडे कधीच बरे होणार नाहीत, असा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

COMMENTS