Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे उपविभागीय कार्यालयासमोर भजन व थाळीनाद आंदोलन

  बुलढाणा प्रतिनिधी - जुन्या पेंन्शन च्या मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीस हजारापेक

अहिल्यादेवी होळकर मिरवणूक नगर शहरात ठरली आकर्षण 
यंदा गहू उत्पादन वाढणार
भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 22 शेळ्यासह एक व्यक्ती जखमी

  बुलढाणा प्रतिनिधी – जुन्या पेंन्शन च्या मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीस हजारापेक्षा जास्त कर्मचारी संपावर गेले असून, विविध प्रकारे जुन्या पेंन्शनची मागणी लावून धरली जात आहे. दरम्यान खामगांवातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शिक्षक, महसूल कर्मचारी तथा शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी थाळीनाद आंदोलन व भजन आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठवड्याभरा पासून सर्व शासकीय निमशासकीय तथा शिक्षक इत्यादी कर्मचाऱ्यांचे “एकच मिशन जुनी पेंन्शन” यासाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र त्या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नसल्यामुळे आज खामगावातील सर्व कर्मचाऱ्यांनी थाळींनाद व भजन आंदोलनास सुरुवात केली आहे. सरकारला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा यावर तोडगा निघत नाही आहे. सरकारला जाग येण्याकरिता व सद्बुद्धी देण्याकरिता सदर थाळीनाद आंदोलन व भजन आंदोलन करत असल्याची कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS