मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही वर्षापूर्वी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देत त्यांची बाजू न्यायालयात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्त
मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही वर्षापूर्वी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देत त्यांची बाजू न्यायालयात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयानं यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या पेन्शन योजनेला सरकारी कर्मचार्यांचा विरोध आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. मात्र, आर्थिक व्यवहार्यतेचा मुद्दा पुढे करत राज्य सरकार अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. कर्मचारी संघटनांनी संपाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या व नव्या योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. कर्मचारी संघटनांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यभरात गोंधळ उडाला आहे. सरकारी कामे रखडली आहेत. सरकारी रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही संपाचा फटका बसला आहे. हाच मुद्दा पुढे करत गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत असल्याने न्यायालयाने तातडीने यात हस्तक्षेप करावा व संपकरी कर्मचारी संघटनांना आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी सदावर्ते यांनी याचिकेत केली आहे. न्यायालयाने सदावर्ते यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
COMMENTS