नवी दिल्ली ः अरूणाचल प्रदेशात गुरुवारी भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेनंतर पायलटसह दोघे बेपत्ता झाल्यामुळे भारतीय लष्करान

नवी दिल्ली ः अरूणाचल प्रदेशात गुरुवारी भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेनंतर पायलटसह दोघे बेपत्ता झाल्यामुळे भारतीय लष्कराने त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे. अरूणाचल प्रदेशातील मंडला डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळले आहे. अरुणाचल प्रदेशातील ही दुर्घटना घडली कशी याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पायलटसह दोघांचा शोध घेण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशातील मंडलाच्या डोंगराळ भागात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. याबाबत गुवाहाटीत संरक्षण विभागाचे पीआरओ कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील बोमडिलानजीक उड्डाण घेतलेल्या चीता हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास संपर्क तुटल्याची माहिती मिळाली होती. हेलिकॉप्टर बोमडिलाच्या पश्चिमेकडे मंडलाजवळ कोसळल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झालं आहे, अशी माहितीही रावत यांनी दिली. मार्च 2022 मध्येही जम्मू-काश्मीरमध्ये चीता हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या घटनेत दोन पायलटपैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर एकाला गंभीर दुखापत झाली होती. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे कारण समोर आले होते. हेलिकॉप्टर उतरवण्यात येत असतानाच खराब हवामानामुळे नियंत्रणाबाहेर गेल्याने ही दुर्घटना घडली होती.
COMMENTS