Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाटयावर

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कोथरुड येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्यानंतर महिला कुस्ती स्पर्धा घेर्‍याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार महा

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा,पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले न्यायालयात जलदगतीने चालविण्याची निवेदनाद्वारे मागणी
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका फेटाळली | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कोथरुड येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्यानंतर महिला कुस्ती स्पर्धा घेर्‍याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बैठक होऊन सांगली येथे 22 व 23 मार्च रोजी कुस्ती स्पर्धा घेण्याचे निश्‍चित झाले असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली आहे. मात्र, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अस्थायी समितीने पुणे शहरा जवळ लोणीकंद येथे घेण्याचे निश्‍चित केल्याने महिला कुस्ती स्पर्धाच्या निमित्ताने महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाटयावर आल्याचे पाहवयास मिळत आहे.
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा नेमकी कोण घेणार हा वाद यापूर्वी निर्माण झाला होता. राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यामुळे दोन गटात दावे-प्रतिदावे झाले होते. अखेर माजी खासदार रामदास तडस यांचे संघटनेला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मान्यता मिळाल्यानंतर बाळासाहेब लांडगे गटाने माघार घेतल्याने वाद शमला होता. परंतु महिला कुस्ती स्पर्धाचे निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले की, सांगलीत 23 व 24 मार्च रोजी महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यास चांदीची गदा दिली जाणार आहे. बाळासाहेब लांडगे म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेस संलग्न 45 संस्था आहे. शहरी व ग्रामीण भागातील संस्था आमच्याशी जोडलेल्या असल्याने ऑलम्पिकची मान्यता आम्हास सर्वात जुनी कुस्तीगीर परिषद म्हणून आहे. उच्च न्यायालयाने देखील कुस्ती घेण्यासाठी आम्हास मान्यता दिलेली आहे. अस्थायी समितीचे अस्तित्व कायम नसून आम्ही आमच्या सर्व स्तरातील स्पर्धा आयोजित करत आहे. अस्थायी समिती महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करणारा याबाबतच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, बाकी मी कोणावर बोलणार नाही हे प्रकरण न्यायालयात आहे. ऑलम्पिक संघटनेची आम्हास मान्यता असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करतो आहे.

COMMENTS