गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्हाच्या देवरी तालुक्यातील परसोडी येथे राहणारे नागरिक एका दुसऱ्या मोठ्या समस्येने त्रस्त असून मुख्य रहदारी असल

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्हाच्या देवरी तालुक्यातील परसोडी येथे राहणारे नागरिक एका दुसऱ्या मोठ्या समस्येने त्रस्त असून मुख्य रहदारी असलेल्या रस्त्याच्या बाजूला पिंपळाचा झाडावर मधमाश्याचे साम्राज्य आहे. झाडावर तब्बल 100 मधमाश्याच्या पोळाचे साम्राज्य असुन अचानक करत असलेल्या हल्लाने अनेकांना जखमी केले आहे. दरम्यान एखादे वाहन झाड़ाजवळून गेले त्याच्या आवाजाने या मधमाश्या उड़त असल्याने अनेक वाटसरु गंभीर जखमी झाले आहे. यात आबाल वृद्धांपासून सर्वांचा समावेश आहे. त्यामुळे परसोडी वासियांनी या मधमाश्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला केली आली आहे.
COMMENTS