Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनरेगाकडून 2.30 कोटी निधी मंजूर ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी  नियोजन विभाग रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाकडे सादर केलेल्या प्

नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुखाला मिरवणुकीत गटबाजीचा राडा l पहा LokNews24
देवळाली प्रवरात अकरावी विज्ञान शाखेच्या प्रश्नपञिका फुटल्या
म्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी  नियोजन विभाग रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळून ग्रामीण भागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी 2 कोटी 30 लक्ष निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या बहुतांश रस्त्यांना निधी मिळवून  या रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लावले असून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून काही रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. या मुख्य रस्त्यांबरोबरच मतदार संघातील ग्रामीण भागाच्या अंतर्गत रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघातील 13 गावांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून 02 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गाव अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटिकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी विकास कामे केली जाणार आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे 13 गावांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये चांदेकसारे (15 लक्ष), चासनळी (35 लक्ष), डाऊच खु. (15 लक्ष), डाऊच बु.. (15 लक्ष),धामोरी (20 लक्ष), बक्तरपूर (20 लक्ष), मोर्विस (15 लक्ष), रवंदे (20 लक्ष), वेस सोयेगाव (15 लक्ष) तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी (15 लक्ष), जळगाव (15 लक्ष), वाकडी (15 लक्ष), शिंगवे (15 लक्ष) असा एकूण 2.30 कोटी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वरील गावातील अंतर्गत रस्त्यांचा विकास होण्यास मदत होणार असून निधी मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल चांदेकसारे, चासनळी, डाऊच खु., डाऊच बु..धामोरी, बक्तरपूर, मोर्विस, रवंदे, वेस सोयेगाव, नपावाडी, जळगाव, वाकडी, शिंगवे या गावातील ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS