Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलाने मारल्याने ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

कोपरगाव प्रतिनिधी ःतालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना बैल गाडी यार्डात ऊस तोडणी कामगार दामु रभा सापनर यांना त्य

कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत
तनपुरे पिता-पुत्रांचे कारखाना बंद पाडण्याचे पाप
एक लाख रुपये न दिल्यास अश्‍लिल फोटो व्हायरल करेल

कोपरगाव प्रतिनिधी ःतालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना बैल गाडी यार्डात ऊस तोडणी कामगार दामु रभा सापनर यांना त्यांच्याच बैलानै सोमवारी सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उचलुन टाकले. गंभीर अवस्थेतील सापनर यांना डॉ. दत्तात्रय कोळपे यांच्या क्लिनिक येथे प्राथमिक उपचार करण्यात येवून कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतुन पुढील उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ते मयत झाले होते. त्याचे मुळ गाव सिन्नर तालुक्यातील मिरगाव असून ते मुकादम मछिंन्द्र हाळणोर यांच्या कडे ऊस तोडणीसाठी आलेले होते कारखान्याचा हंगाम अवघा काही दिवसावर येवून ठेपला असतांना सापनर यांच्या दुर्दैवी म्रत्यु ने ऊसतोडणी कामगार व ग्रामस्थामध्ये शोककळा पसरली आहे. कोळपेवाडी परिसरातील अपघाती मृत्यूची हि दुसरी घटना आहे.

COMMENTS