कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्धतेची तयारी ; नगरच्या उद्योजकाने घेतला पुढाकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्धतेची तयारी ; नगरच्या उद्योजकाने घेतला पुढाकार

कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील उद्योजक विलास लोढा यांनी ऑक्सिजन उपलब्धतेसाठी पुढाकार घेतला आहे.

वृद्धेश्‍वरकडून महिला बचत गटांना 1 कोटी 27 लाखांचे कर्ज वाटप
उजनी उपसा जलसिंचन योजना कामाबाबत दिशाभूल ः कैलास राहणे
जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत संगमनेर तालुका जिल्ह्यात प्रथम

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील उद्योजक विलास लोढा यांनी ऑक्सिजन उपलब्धतेसाठी पुढाकार घेतला आहे. युवक काँग्रेसने यासाठी प्रयत्न केले आहेत. अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस व युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोविड रुग्णांना दररोज 500 ते 600 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देणार असल्याचे उद्योजक विलास लोढा यांनी सांगितले. 

नगरमध्येही एमआयडीसी येथील अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस कंपनीच्यावतीने ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती केली जाते. सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजनची अधिक आवश्यकता भासत असल्याने अहमदनगर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोसिम शेख व कंपनीचे संचालक विलास लोढा यांनी पुढाकार घेत दररोज 500 ते 600 सिलेंडर कोरोना बाधित रुग्ण असलेल्या हॉस्पिटलसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचा मानस केला आहे. प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक असणार्‍या रुग्णांलयासाठी ती उपलब्ध करुन दिली जातील. त्याच बरोबर कंपनीच्यावतीने आणखी जास्तीतजास्त ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती कशी करता येईल, या दृष्टीनेही प्रयत्न सुरु असल्याची माहिती लोढा यांनी दिली. कंपनीच्या वतीने औद्योगिक वापराबरोबर हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती करण्यात येत आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. या गोष्टीचा विचार करुन आम्ही हॉस्पिटलला आवश्यक असणार्‍या सिलेंडरला प्राधान्य देऊन ते उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली असून, त्या माध्यमातून दररोज 500 ते 600 सिलेंडर हॉस्पिटलला उपलब्ध करुन देणार आहेत, असे शेख यांनी सांगितले. सध्या नागरिकांचे प्राण महत्वाचे असून, त्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS