पुणे : घरकाम जमत नसल्याचा आरोप करुन सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसा
पुणे : घरकाम जमत नसल्याचा आरोप करुन सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सासूला अटक केली. रितू रवींद्र माळवी (वय 28, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सासू कमला प्रभुलाल माळवी (वय 49) हिला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रितू माळवीला घरकाम जमत नाही तसेच ती नातवाला व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करुन सासू कमला तिचा छळ करत होती. दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरातील फ्रीज उघडताना रितूला पाय लागल्याने वाद झाला होता. त्या वेळी रितूने सासू कमलाशी वाद घातला. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात रितूच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण झाल्याचे उघड झाले. सासू कमलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करत आहेत.
COMMENTS