Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमपीएससी परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोनाली मात्रे हिचे जन्मभूमीत जंगी स्वागत

  बीड प्रतिनिधी - एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या सोनाली मात्रे हीचा तिची जन्म भुमी असलेल्या बीडच्या इरला मजरा या गावी

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना न्यायालयीन पदांसाठी विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण
अभिनेता अक्षय कुमारच्या आईचे निधन… ट्विट करत दिली माहिती
ढाकणी येथे अज्ञात बोलेरोच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू

  बीड प्रतिनिधी – एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या सोनाली मात्रे हीचा तिची जन्म भुमी असलेल्या बीडच्या इरला मजरा या गावी जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने १०० किलोचा हार घालून फटाक्याची आतषबाजी करत ग्रामस्थांनी आनंद साजरा केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल दोन दिवसापूर्वी जाहीर झाला होता. या परीक्षेत माजलगावच्या सोनाली मात्रे महिलांमध्ये राज्यातून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावून बीडची मान राज्यात उंचावली. त्याबद्दल सोनालीचे तिचे जन्म गाव असणाऱ्या इरला मजरा या जन्मगावी क्रेनच्या सहाय्याने १०० किलोचा हार घालून आणि फटाक्याची आतिषबाजी करून स्वागत केले. तिच्या या यशाने अख्ख्या गावच्या लहान, मोठ्यांनी आनंद व्यक्त केला. जागतिक महिलादिनी तिचा हा सत्कार झाल्याने तिने हे यश सर्व महिलांना समर्पित केले. तर महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS