बुलढाणा प्रतिनिधी - हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सध्या उन्हाळ
बुलढाणा प्रतिनिधी – हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सध्या उन्हाळा सुरु झालेला असताना पाऊस पडल्याने काल पासून थंडीही जाणवत आहे. यामध्ये शेगाव खामगाव शहर व परिसरात धुक्याची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जमिनीत ओलावा निर्माण झालेला असून काल पासून थंडीही जाणवू लागली आहे. यातच आज बुधवारी पहाटे पासून खामगाव शेगाव परिसरात धुक्याची चादर पाहावयास मिळाली. जिल्ह्यातील बहुतांशी भागात गेले तीन दिवस पाऊस सुरू होता. आज पावसाने उघडीप दिल्यानंतर परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. धुक्याचा दृष्यमानतेवरही परिणाम झाला. अंधूक वातावरणामुळे इंडीकेटर देत गाड्यांना रस्त्यातून मार्ग काढावा लागला.
COMMENTS