धुळे प्रतिनिधी - मोहाडी उपनगरातील दंडेवालेबाबा नगरात तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा निखिल शांताराम अहिरे (वय २७) याला त्याच्या घरातूनच प
धुळे प्रतिनिधी – मोहाडी उपनगरातील दंडेवालेबाबा नगरात तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा निखिल शांताराम अहिरे (वय २७) याला त्याच्या घरातूनच पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्याच्याकडून ४ हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला.
मोहाडी उपनगरातील दंडेवालेबाबा नगरात निखिल अहिरे नामक तरुण तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच धुळे एलसीबीच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला निखिल याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. आणि घरात लपविलेल्या ४ हजारांच्या दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या.
त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता २०१९ पासून तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला आहे. त्याच्यावर दरोडासह चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल आहेत. अजून इतर जिल्ह्यात त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का..? त्याने ह्या तलवारी कशासाठी आणल्या होत्या, त्यामागे याचा काही घातपात करण्याचा उद्देश होता का.? यासर्व बाबींचा पोलिस तपास करीत आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, कमलेश सूर्यवंशी, संदीप सरग, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, राहुल सानप, राहुल गिरी यांनी कारवाई केली. त्यांच्या या कारवाईचे पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.
COMMENTS