Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत

मुंबई प्रतिनिधी - शाहरुख खानच्या 'पठान' सिनेमाने हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. शाहरुखने 'पठान' सिनेमातून जोरदार कमबॅक केलं आहे. याच

योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड
प.बंगालच्या राज्यपालांना क्लीन चीट
धनलक्ष्मी शाळेत उपक्रमातून साकारत आहे लोकशाही शिक्षण

मुंबई प्रतिनिधी – शाहरुख खानच्या ‘पठान’ सिनेमाने हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. शाहरुखने ‘पठान’ सिनेमातून जोरदार कमबॅक केलं आहे. याचदरम्यान, शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी हाती आली आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आयपीसी ४०९ अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  रिपोर्टनुसार, तुलसियानी कंट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार , डायरेक्टर महेश तुलसियानी आणि शाहरुख खानची  पत्नी, कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान विरोधात एफआयर दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, एफआयआरमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर आरोप आहे की, लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी परिसरातील तुससियानी गोल्फ व्ह्यू इमारतीत एका फ्लॅटसाठी एका व्यक्तीने ८६ लाख रुपये दिले होते. या व्यक्तीने प्लॅट खरेदीचे ८६ लाख रुपये पैसे मोजल्यानंतरही त्या व्यक्तीच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला या फ्लॅटची विक्री करण्यात आली. तक्रारदाराने गौरी खानच्या विरोधात देखील एफआयआर दाखल केला आहे. त्यामागचे कारण सांगताना तक्रारदाराने स्पष्ट केले की, गौरी खान या कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर असून त्यांच्या प्रचार-प्रसारास प्रभावित होऊन मी प्लॅट बुक केला.

COMMENTS