Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा रस्त्यावर ओतून शेतकर्‍यांचा संताप

राज्य सरकारने कांदा धोरण जाहीर करण्याची स्वाभिमानी संघटनेची मागणी

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प बाजारभावामुळे तसेच सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा रस्त्यावर आलाय, सरकारने

संगमनेरमध्ये बांधकाम मजुरांचा शनिवारी मोर्चा
मनपाचा कर संकलन पैसा जातो कोठे? ; मंत्री थोरातांचा आयुक्त गोरेंना प्रश्‍न
पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण 

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प बाजारभावामुळे तसेच सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा रस्त्यावर आलाय, सरकारने बळीराजाची क्रुरचेष्टा चालवली आहे असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी रास्तारोको आंदोलन प्रसंगी केले. राहुरी बाजार समितीच्या मुख्यप्रवेश द्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत नगर मनमाड रस्त्यावर कांदा ओतून देत रास्तारोको आंदोलन केले.
राज्यभरात कांद्याला मिळत असलेला अत्यल्प बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक संकटात सापडलेला आहे उत्पादन खर्चही फिटेना अशी स्थिती असून याबाबत शासनाने लवकरच कांद्याबाबत धोरण स्पष्ट करत किमान 2500 रुपये बाजारभाव मिळावा अशी मागणी करतानाच विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहिर करावे अशी मागणी करतानाच सध्या शेतकर्‍यांच्या कुठल्याही शेतमालालाला बाजारभाव हा कवडीमोल मिळत आहे तर दुसरीकडे शेतकर्‍यांची विज कनेक्शन कट करण्याचे धोरण राबवून शासन शेतकर्‍यांना अधिकच संकटात टाकत आहे. अधिकार्‍यांनी विज कनेक्शन कट केले नाही तर त्यांना सस्पेंड करण्याचे आदेश सरकार देत आहे हे चूकीचे असून जर सरकारने आपले धोरण बदलले नाही तर येत्या 2024 ला सरकारला सस्पेंड केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही असा इशारा मोरे यांनी दिला आजचे आंदोलन हे प्रातिनिधीक स्वरुपाचे असून दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करु अशी भुमिका मांडली. याप्रसंगी कांदा उत्पादकांनी ट्रँक्कर ट्रॉलीतून आणलेला कांदा रस्त्यावर ओतून देत निषेध नोंदवला यावेळी बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे, सुरेश बाफना, प्रकाश देठे, दीपक तनपुरे, बाळासाहेब जाधव, पिंटूनाना साळवे, संतोष आघाव, पांडू उदावंत, सचिन म्हसे, आनंद वने, सतिष पवार, राहुल करपे, अशोक निमसे, सतिष निमसे, अशोक चौधरी सचिन उंडे आदी उपस्थित होते. आंदोलन प्रसंगी नायब तहसिलदार संध्या दळवी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले तर राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मेघश्याम डांगे यांचे मार्गदर्शनात राहुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर रास्तारोकोमुळे रस्त्याच्या दूतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

COMMENTS